नुकतीच दिवाळी संपली होती,माझ्याही सुट्ट्या आज संपणार होत्या. सकाळी मी साखर झोपेतच होतो ...... कार्तीक महीना सुरु असल्य मुळे आई सकाळी सकाळी आरती संपून नुकतीच आली असावी.तीचे शब्द मंद आणि दुखी होते ..... ती म्हणाली , "सुमीत उठ आता तुला माहीती आहे का काय झाले ते ........समोरच्या आजी मरण पावल्या !!!!!!!!!" हे शब्द कानी येताच वीज चमकावी तसा मी उठलो; पहाटेचा गार वारा...., ती प्रसन्न सकाळ, पक्ष्यांचा चिवचिवाट सारे काही त्या मरणाच्या काळोखात विलीन झाले होते. माला तर बोलायला शब्दाच सुचत नव्हते. ज्या आजीन्शी दोन दिवसापूर्वी मी गप्पा केल्या होत्या.. दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या त्या आज अचानक अस्थमा च्या झटक्या ने आम्हाला सोडून गेल्या होत्या.............................
अगदी आमच्या बाजुच्या रांगेत रहत असलेल्या कोथलकर परीवाराताल्या ह्या आजी, वय वर्ष ८५ , आजोबांचे वय वर्ष ९०;
आजोबा रेल्वेत कामाला होते..... त्यांच्या बोलण्यातून अजुनही जाणवायाचे त्यानी आयुष्य कीती अभीमनाने जगले ते.त्यांचा आवाज अजुनही कणखर होता, या वयात देखील स्वताहची पेंशन ते स्वताहाच आणायचे. गप्पा करताना ते लहनानमधे लहान तर मोठ्यान मधे मोठे असायचे.
आजी आजोबाना शोभतील अश्याच होत्या. सोनकांती, उंच बंधा... बोलके डोळे... सनासुदीला सजल्या म्हणजे एखाद्या तरुण पोरीलाही लाजवेल इतक्या सुंदर !!!! गेले दहा- पंधरा वर्ष मी ह्या एरिया मधे रहत होतो .. रोज संध्याकाळी त्यांच्या घराच्या अंगणात असलेल्या पाळण्यावर दोघेही एकत्र बराच वेळ गप्पा मारायचे ..... नक्कीच जून्या आठवणीना उजाला देत असतील .... पण , त्यंच्या गप्पा म्हणजे माझ्यासाठी तरी कुतुहलाचा विषय होता...
आजचा दिवस इतरांसाठी नेहमीप्रमाणेच होता पण कोथलकर परिवारासठी आक्रोशाचा, दूखाचा होता !!!!! दुपार पर्यंत अन्तीम यात्रा नीघनर होती. ज्या ज्या नातेवाईकाना कळाले होते ते सगळे आले होते, काही अजून यायचे होते. घरातून फक्त रडण्याचाच आवाज येत होता..... आजींचे मुले, मुली, नातवंड अगदी त्यांच्याकडे काम करणारी काम वाली बाई सुद्धा स्वतःला आवरू शकत नव्हते. हे सगळे स्वभावीक होते. घरातील आई - आजी नावाचे वृक्ष पडले होते !!!! इतके वर्ष सोबत असलेली कूणी व्यक्ती अचानक आपल्याला सोडून जाते ही ते ही परत कधी न दिसण्यासाठी ही कल्पनाच असह्य आहे. पण हेच सत्य आहे.
आजीना आता काही वेळात घरून नेणार होते, अंगणात त्यांच्या मृत शरिराभोवाती सगळे jamale होते, प्रत्येकाचे रड़ने चालूच hote, त्या मृत शरीराला कुणी आई म्हणून हाक मारत होते तर कुणी आजी , कुणी सासूबaई, तर कुणी माई !!! रडण्याचा आवाज आसमंतात पसरला होता !!!!
हे सगळे पाहत असताना माझे लक्ष्य प्रेताच्या बाजूला उभे असलेल्या आजोबांकडे गेले....
पांढरा सदर, पांढरे धोतर ,दोन्ही हात काठीवर पुढे आलेले,चेहऱ्यावर स्तब्ध भाव , डोळ्यांच्या किनारी हलक्या ओल्या , नजारा फक्त त्या मृत शरीराच्या डोळ्यांकडे, ........
या सगल्या गर्दी मधे सगळ्यात दुखी असलेला चेहरा मी पाहत होतो..... रडण्याच्या, आक्रोशाच्या आवजान्पेक्षा आजोबांचे स्तब्ध भाव लक्ष्य वेधून घेत hote, त्यांचे दुख आज आभाळ झाले होते !!!! आयुष्यभर साथ देणारा सोबती आज हा प्रवास सोडून चालला होता!!!!! आजोबांचा कंठ दाटून आला होता .......
त्या सहप्रवाश्या वार फुले सोडताना त्यानी शेवटी तिला नोरोप दिला तो ही ह्या शब्दात -----------' तू मला फसवलेस !!!!!!!!!! तू मला फसवलेस !!!!!!'
हे शब्द कादाचीत सहज नसावे .... कारण त्याच्या मागच्या भावना प्रेमाच्या होत्या,जाणीवेच्या होत्या, गेले ७० वर्ष सोबत असलेल्या प्रीयसीसाठी होत्या..................... इतरांसाठी जरी ते एक मृत शरीर होते पण आजोबांसाठी ते अजूनही त्यांची नव विवाहित पत्नी होते, त्यांचे म्हातारपण इतरांसाठी होते पण आजीसाठी ते अजूनही तरुण होते ...... त्या दोघांमध्ये चाललेला संवाद नक्कीच कुणी एकला नसेल पण शेवट हाच होता ...............................तू मला फसवलेस !!!!!!!!!!!!!!!!!!
कदाचीत आजी हे तर म्हणत नसतील ............................
त्या सहप्रवाश्या वार फुले सोडताना त्यानी शेवटी तिला नोरोप दिला तो ही ह्या शब्दात -----------' तू मला फसवलेस !!!!!!!!!! तू मला फसवलेस !!!!!!'
हे शब्द कादाचीत सहज नसावे .... कारण त्याच्या मागच्या भावना प्रेमाच्या होत्या,जाणीवेच्या होत्या, गेले ७० वर्ष सोबत असलेल्या प्रीयसीसाठी होत्या..................... इतरांसाठी जरी ते एक मृत शरीर होते पण आजोबांसाठी ते अजूनही त्यांची नव विवाहित पत्नी होते, त्यांचे म्हातारपण इतरांसाठी होते पण आजीसाठी ते अजूनही तरुण होते ...... त्या दोघांमध्ये चाललेला संवाद नक्कीच कुणी एकला नसेल पण शेवट हाच होता ...............................तू मला फसवलेस !!!!!!!!!!!!!!!!!!
कदाचीत आजी हे तर म्हणत नसतील ............................
देशील का रे मित्र माझी साथ ?
म्हणशील का रे की तू एकटी नाहीस?
कधी मारशील कारे पाठीवर एक निस्वार्थी थाप?
कधी धरशील का रे विश्वासार्थी माझा हात ?
राहूदे रे. नको घेउस तू अपेक्षांचा ओझं
तू नेहमीच नसणारेस हे मला कळतंय
पण तुझ्याआधी मीच निघणार असं वाटतंय...
मला आज फारच सुनं सुनं वाटतंय
मला आज फारच सुनं सुनं वाटतंय
(ही कविता माझी नाही ..........)
म्हणशील का रे की तू एकटी नाहीस?
कधी मारशील कारे पाठीवर एक निस्वार्थी थाप?
कधी धरशील का रे विश्वासार्थी माझा हात ?
राहूदे रे. नको घेउस तू अपेक्षांचा ओझं
तू नेहमीच नसणारेस हे मला कळतंय
पण तुझ्याआधी मीच निघणार असं वाटतंय...
मला आज फारच सुनं सुनं वाटतंय
मला आज फारच सुनं सुनं वाटतंय
(ही कविता माझी नाही ..........)
सुमीत !!!
Atiutkrushata!! mala sampurna prasanga dolya samor ubha jhala.
ReplyDeletelife is what?. If you don't know read
ReplyDeleteSumit's blogs.