Monday, December 6, 2010

देवा का रे तू असा वागतोस ????????



little Angel
Her Mother and Father.


रविवार तसा नेहमीचाच होता, सकळी सकाळी मित्रांचे फोने आले..... काय प्लान आहेत आज ते !!!! प्लान तसे फारसे काही विशेष नव्हते. बर्याच दिवसामध्ये मंदिरात गेलो नव्हतो त्यामुळे म्हंटला आज मंदिरात जाऊ या. लगेच प्लान ठरला की दगडूशेठ ला जायचे .  साधारण १० - ११ च्या सुमारास आम्ही मंदिरात होतो. रविवार असल्यामुळे गर्दी तशी होतीच ,,,,, माणसांची ये जा चालूच होती. आम्हीपण रांगेत लागून पुढे पुढे सरकत होतो. मूर्तीपुढे येताच दगडूशेठ गणपती ला श्रीमंत का म्हणतात त्याची प्रचीती येते. सोन्याच्या दागीन्यांनी सजलेली ती गणरायाची मूर्ती विलोभनीय आहे. मूर्तीला पाहून डोळे मिटल्यावर मिळणारे समाधान सगळे दुःख दूर करणारे असते. क्षणभर का होईना पण भक्तांना मनःशांती मिळते.
रांगेतून बाहेर येऊन आम्ही गाभ्यारात स्मरणासाठी बसलो. आमच्या शेजारीच एक जोडपे आणि त्यांची २-३ वर्षाची मुलगी बसली होती. माझे विशेष असे लक्ष्य नव्हते .. पण काही वेळानी मुलीच्या आईने तिला पेढ्यांचा प्रसाद दिला आणि सांगितले की शेजारच्या काकांना प्रसाद दे म्हणून. अगदी लहान असल्यामुळे ती जरा सुरवातीला बोलायला घाबरत होती पण मीच तिचा जरा लाड करून तिच्याशी  मैत्री केली आणि प्रसाद घेतला. दिसायला अगदी गोंडस असलेला चेहरा, डोळ्यातली निरागसता,बोबडे शब्द सगळच मन वेधणारे. तुम्हीही फोटो मध्ये तिला पाहू शकता !!!!!  लहान मुलांचा लळा तसा सगळ्यांनाच लागतो, मीही काही वेगळा नव्हतो. 
 घंटा नाद तसाच कानी पडत होता, भक्तांचे मंत्रोच्चार तसेच चालू होते, लोकांची ये जा पण तशीच...... तेवढ्यात काही शब्द कानावर आलेत "बाळा!!! चला आता घरी नाही का जायचे आपल्याला !!!" त्या लहान मुलीच्या आईने तिला हाक मारली होती.ती जाणार हे पाहून तिला टाटा करायला मी पण त्यांच्या जवळ गेलो !!! जवळ जाताच मी क्षणभर स्तब्ध झालो........... प्रश्नाचे अनेक वादळ  उठले!!!!!
या स्तब्धतेचे  कारण तसेच होते ...........
तिच्या आईजवळ गेल्यावर मला कळले की तिची आई अंध आहे तिचे डोळे ८० टक्के निकामी आहेत, तिची दृष्टी अस्पष्ट आहे!!!!! तिच्यासाठी स्पर्श म्हणजेच तिचे डोळे,कानावर येणारी श्बदांची चाहूल म्हणजे तिची नजर होती !!!! बाजूलाच बसलेले तिचे वडील ..... ते तर पूर्णच आंधळे होते!!!!! एक हात बायकोच्या कान्ध्यावर तर दुसऱ्या हातात अंधांची काठी आणि dolyanee दिसणारा  फक्त अंधार सोबतीला !!!!  अश्या आई-बापाची ती चिमुकली पोर होती ...... काजळ भरलेल्या , नितळ डोळ्यांची, ती छोटीशी परीच होती.......

त्या इवल्याश्या हातानी देवाला नमस्कार करताना काय बरे मागावे ????? हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे . कदाचित त्याचाच अंश तिच्यात असावा !!! त्याने कुणासाठी काय ठरवले आहे हे कुणालाच माहित नाही , कदाचित मंदिरातल्या गर्दीला हेच कारण असावे....

मंदिरातून निघताना वाटल  की तिच्या आई-बाबांना सांगावे की तुमची मुलगी फार सुंदर आहे .... पण अंधाराच्या  जगात सुंदरतेची परिभाषा काय आहे हे मला माहित नव्हते म्हणून माझ्या शब्दांना वाट मिळाली नाही .
निघताना विघ्नहर्त्याला फक्त एकच सांगून आलो ............... त्या नितळ डोळ्यांना उदंड आयुष्य दे!!!!!!!!!!!!!!!


                                                                                                                                            ---- सुमीत

 

Saturday, December 4, 2010

तू मला फसवलेस !!!!!



नुकतीच दिवाळी संपली होती,माझ्याही सुट्ट्या आज संपणार होत्या. सकाळी मी साखर झोपेतच होतो ...... कार्तीक  महीना सुरु असल्य मुळे आई  सकाळी सकाळी आरती संपून नुकतीच आली असावी.तीचे शब्द मंद आणि दुखी होते ..... ती म्हणाली , "सुमीत उठ आता तुला माहीती आहे का काय झाले ते ........समोरच्या आजी मरण पावल्या !!!!!!!!!"  हे शब्द कानी येताच वीज चमकावी तसा मी उठलो; पहाटेचा गार वारा...., ती  प्रसन्न सकाळ, पक्ष्यांचा चिवचिवाट सारे काही त्या मरणाच्या काळोखात विलीन झाले होते. माला तर बोलायला शब्दाच सुचत नव्हते. ज्या आजीन्शी दोन दिवसापूर्वी मी गप्पा केल्या होत्या..  दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या त्या आज अचानक अस्थमा च्या झटक्या ने आम्हाला सोडून गेल्या होत्या.............................

अगदी आमच्या बाजुच्या रांगेत रहत असलेल्या कोथलकर परीवाराताल्या   ह्या आजी, वय वर्ष ८५ , आजोबांचे वय वर्ष ९०;
आजोबा रेल्वेत कामाला होते..... त्यांच्या बोलण्यातून अजुनही जाणवायाचे त्यानी आयुष्य कीती अभीमनाने जगले ते.त्यांचा आवाज अजुनही कणखर होता, या वयात देखील स्वताहची पेंशन ते स्वताहाच आणायचे. गप्पा करताना ते लहनानमधे लहान तर मोठ्यान मधे मोठे असायचे. 
आजी आजोबाना शोभतील अश्याच होत्या. सोनकांती, उंच  बंधा... बोलके डोळे... सनासुदीला सजल्या म्हणजे एखाद्या तरुण पोरीलाही लाजवेल इतक्या सुंदर !!!!  गेले दहा- पंधरा  वर्ष मी ह्या एरिया मधे रहत होतो .. रोज संध्याकाळी त्यांच्या घराच्या अंगणात  असलेल्या पाळण्यावर दोघेही एकत्र बराच वेळ गप्पा मारायचे .....  नक्कीच जून्या आठवणीना उजाला देत असतील .... पण , त्यंच्या गप्पा म्हणजे माझ्यासाठी तरी कुतुहलाचा विषय होता... 

 आजचा दिवस इतरांसाठी नेहमीप्रमाणेच होता पण कोथलकर परिवारासठी आक्रोशाचा, दूखाचा होता !!!!! दुपार पर्यंत अन्तीम यात्रा नीघनर होती. ज्या ज्या नातेवाईकाना कळाले  होते  ते सगळे आले होते, काही अजून यायचे होते. घरातून फक्त रडण्याचाच आवाज येत होता..... आजींचे मुले, मुली, नातवंड अगदी त्यांच्याकडे काम करणारी काम वाली बाई सुद्धा स्वतःला आवरू शकत नव्हते. हे सगळे स्वभावीक होते. घरातील आई - आजी नावाचे वृक्ष पडले होते !!!!  इतके वर्ष सोबत असलेली कूणी व्यक्ती  अचानक आपल्याला सोडून जाते ही ते ही परत कधी न दिसण्यासाठी  ही कल्पनाच असह्य आहे. पण हेच सत्य आहे.

 आजीना आता काही वेळात घरून नेणार होते, अंगणात त्यांच्या मृत शरिराभोवाती सगळे jamale होते, प्रत्येकाचे रड़ने चालूच  hote, त्या मृत शरीराला कुणी आई म्हणून हाक मारत होते तर कुणी आजी , कुणी सासूबaई, तर कुणी माई !!! रडण्याचा आवाज  आसमंतात  पसरला होता !!!! 
हे सगळे पाहत असताना माझे लक्ष्य प्रेताच्या बाजूला उभे असलेल्या आजोबांकडे गेले....
पांढरा सदर, पांढरे धोतर ,दोन्ही हात काठीवर पुढे आलेले,चेहऱ्यावर  स्तब्ध   भाव , डोळ्यांच्या किनारी हलक्या ओल्या , नजारा फक्त त्या मृत शरीराच्या डोळ्यांकडे,   ........
 या सगल्या गर्दी मधे सगळ्यात दुखी असलेला चेहरा  मी पाहत होतो..... रडण्याच्या, आक्रोशाच्या आवजान्पेक्षा आजोबांचे स्तब्ध भाव लक्ष्य वेधून घेत hote, त्यांचे दुख आज आभाळ झाले होते !!!!  आयुष्यभर साथ देणारा सोबती आज हा प्रवास सोडून चालला होता!!!!! आजोबांचा कंठ दाटून आला होता .......
त्या सहप्रवाश्या वार फुले सोडताना त्यानी शेवटी तिला नोरोप दिला तो ही ह्या शब्दात -----------' तू मला फसवलेस !!!!!!!!!! तू मला फसवलेस !!!!!!'
हे शब्द कादाचीत सहज नसावे .... कारण त्याच्या मागच्या भावना प्रेमाच्या होत्या,जाणीवेच्या होत्या, गेले ७० वर्ष  सोबत असलेल्या प्रीयसीसाठी  होत्या..................... इतरांसाठी जरी ते एक मृत  शरीर होते  पण आजोबांसाठी ते अजूनही त्यांची नव विवाहित पत्नी होते, त्यांचे म्हातारपण इतरांसाठी होते  पण आजीसाठी ते अजूनही तरुण होते ...... त्या दोघांमध्ये चाललेला संवाद नक्कीच कुणी एकला नसेल पण शेवट हाच होता ...............................तू मला फसवलेस !!!!!!!!!!!!!!!!!!

कदाचीत आजी हे तर म्हणत  नसतील ............................

देशील का रे मित्र माझी साथ ?
म्हणशील का रे की तू एकटी नाहीस?
कधी मारशील कारे पाठीवर एक निस्वार्थी थाप?
कधी धरशील का रे विश्वासार्थी माझा हात ?
राहूदे रे. नको घेउस  तू अपेक्षांचा ओझं
तू नेहमीच नसणारेस हे मला कळतंय
पण तुझ्याआधी मीच निघणार असं वाटतंय...
मला आज फारच सुनं सुनं वाटतंय
मला आज फारच सुनं सुनं वाटतंय

(ही कविता माझी नाही ..........)
सुमीत !!!