Monday, December 6, 2010

देवा का रे तू असा वागतोस ????????



little Angel
Her Mother and Father.


रविवार तसा नेहमीचाच होता, सकळी सकाळी मित्रांचे फोने आले..... काय प्लान आहेत आज ते !!!! प्लान तसे फारसे काही विशेष नव्हते. बर्याच दिवसामध्ये मंदिरात गेलो नव्हतो त्यामुळे म्हंटला आज मंदिरात जाऊ या. लगेच प्लान ठरला की दगडूशेठ ला जायचे .  साधारण १० - ११ च्या सुमारास आम्ही मंदिरात होतो. रविवार असल्यामुळे गर्दी तशी होतीच ,,,,, माणसांची ये जा चालूच होती. आम्हीपण रांगेत लागून पुढे पुढे सरकत होतो. मूर्तीपुढे येताच दगडूशेठ गणपती ला श्रीमंत का म्हणतात त्याची प्रचीती येते. सोन्याच्या दागीन्यांनी सजलेली ती गणरायाची मूर्ती विलोभनीय आहे. मूर्तीला पाहून डोळे मिटल्यावर मिळणारे समाधान सगळे दुःख दूर करणारे असते. क्षणभर का होईना पण भक्तांना मनःशांती मिळते.
रांगेतून बाहेर येऊन आम्ही गाभ्यारात स्मरणासाठी बसलो. आमच्या शेजारीच एक जोडपे आणि त्यांची २-३ वर्षाची मुलगी बसली होती. माझे विशेष असे लक्ष्य नव्हते .. पण काही वेळानी मुलीच्या आईने तिला पेढ्यांचा प्रसाद दिला आणि सांगितले की शेजारच्या काकांना प्रसाद दे म्हणून. अगदी लहान असल्यामुळे ती जरा सुरवातीला बोलायला घाबरत होती पण मीच तिचा जरा लाड करून तिच्याशी  मैत्री केली आणि प्रसाद घेतला. दिसायला अगदी गोंडस असलेला चेहरा, डोळ्यातली निरागसता,बोबडे शब्द सगळच मन वेधणारे. तुम्हीही फोटो मध्ये तिला पाहू शकता !!!!!  लहान मुलांचा लळा तसा सगळ्यांनाच लागतो, मीही काही वेगळा नव्हतो. 
 घंटा नाद तसाच कानी पडत होता, भक्तांचे मंत्रोच्चार तसेच चालू होते, लोकांची ये जा पण तशीच...... तेवढ्यात काही शब्द कानावर आलेत "बाळा!!! चला आता घरी नाही का जायचे आपल्याला !!!" त्या लहान मुलीच्या आईने तिला हाक मारली होती.ती जाणार हे पाहून तिला टाटा करायला मी पण त्यांच्या जवळ गेलो !!! जवळ जाताच मी क्षणभर स्तब्ध झालो........... प्रश्नाचे अनेक वादळ  उठले!!!!!
या स्तब्धतेचे  कारण तसेच होते ...........
तिच्या आईजवळ गेल्यावर मला कळले की तिची आई अंध आहे तिचे डोळे ८० टक्के निकामी आहेत, तिची दृष्टी अस्पष्ट आहे!!!!! तिच्यासाठी स्पर्श म्हणजेच तिचे डोळे,कानावर येणारी श्बदांची चाहूल म्हणजे तिची नजर होती !!!! बाजूलाच बसलेले तिचे वडील ..... ते तर पूर्णच आंधळे होते!!!!! एक हात बायकोच्या कान्ध्यावर तर दुसऱ्या हातात अंधांची काठी आणि dolyanee दिसणारा  फक्त अंधार सोबतीला !!!!  अश्या आई-बापाची ती चिमुकली पोर होती ...... काजळ भरलेल्या , नितळ डोळ्यांची, ती छोटीशी परीच होती.......

त्या इवल्याश्या हातानी देवाला नमस्कार करताना काय बरे मागावे ????? हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे . कदाचित त्याचाच अंश तिच्यात असावा !!! त्याने कुणासाठी काय ठरवले आहे हे कुणालाच माहित नाही , कदाचित मंदिरातल्या गर्दीला हेच कारण असावे....

मंदिरातून निघताना वाटल  की तिच्या आई-बाबांना सांगावे की तुमची मुलगी फार सुंदर आहे .... पण अंधाराच्या  जगात सुंदरतेची परिभाषा काय आहे हे मला माहित नव्हते म्हणून माझ्या शब्दांना वाट मिळाली नाही .
निघताना विघ्नहर्त्याला फक्त एकच सांगून आलो ............... त्या नितळ डोळ्यांना उदंड आयुष्य दे!!!!!!!!!!!!!!!


                                                                                                                                            ---- सुमीत

 

Saturday, December 4, 2010

तू मला फसवलेस !!!!!



नुकतीच दिवाळी संपली होती,माझ्याही सुट्ट्या आज संपणार होत्या. सकाळी मी साखर झोपेतच होतो ...... कार्तीक  महीना सुरु असल्य मुळे आई  सकाळी सकाळी आरती संपून नुकतीच आली असावी.तीचे शब्द मंद आणि दुखी होते ..... ती म्हणाली , "सुमीत उठ आता तुला माहीती आहे का काय झाले ते ........समोरच्या आजी मरण पावल्या !!!!!!!!!"  हे शब्द कानी येताच वीज चमकावी तसा मी उठलो; पहाटेचा गार वारा...., ती  प्रसन्न सकाळ, पक्ष्यांचा चिवचिवाट सारे काही त्या मरणाच्या काळोखात विलीन झाले होते. माला तर बोलायला शब्दाच सुचत नव्हते. ज्या आजीन्शी दोन दिवसापूर्वी मी गप्पा केल्या होत्या..  दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या त्या आज अचानक अस्थमा च्या झटक्या ने आम्हाला सोडून गेल्या होत्या.............................

अगदी आमच्या बाजुच्या रांगेत रहत असलेल्या कोथलकर परीवाराताल्या   ह्या आजी, वय वर्ष ८५ , आजोबांचे वय वर्ष ९०;
आजोबा रेल्वेत कामाला होते..... त्यांच्या बोलण्यातून अजुनही जाणवायाचे त्यानी आयुष्य कीती अभीमनाने जगले ते.त्यांचा आवाज अजुनही कणखर होता, या वयात देखील स्वताहची पेंशन ते स्वताहाच आणायचे. गप्पा करताना ते लहनानमधे लहान तर मोठ्यान मधे मोठे असायचे. 
आजी आजोबाना शोभतील अश्याच होत्या. सोनकांती, उंच  बंधा... बोलके डोळे... सनासुदीला सजल्या म्हणजे एखाद्या तरुण पोरीलाही लाजवेल इतक्या सुंदर !!!!  गेले दहा- पंधरा  वर्ष मी ह्या एरिया मधे रहत होतो .. रोज संध्याकाळी त्यांच्या घराच्या अंगणात  असलेल्या पाळण्यावर दोघेही एकत्र बराच वेळ गप्पा मारायचे .....  नक्कीच जून्या आठवणीना उजाला देत असतील .... पण , त्यंच्या गप्पा म्हणजे माझ्यासाठी तरी कुतुहलाचा विषय होता... 

 आजचा दिवस इतरांसाठी नेहमीप्रमाणेच होता पण कोथलकर परिवारासठी आक्रोशाचा, दूखाचा होता !!!!! दुपार पर्यंत अन्तीम यात्रा नीघनर होती. ज्या ज्या नातेवाईकाना कळाले  होते  ते सगळे आले होते, काही अजून यायचे होते. घरातून फक्त रडण्याचाच आवाज येत होता..... आजींचे मुले, मुली, नातवंड अगदी त्यांच्याकडे काम करणारी काम वाली बाई सुद्धा स्वतःला आवरू शकत नव्हते. हे सगळे स्वभावीक होते. घरातील आई - आजी नावाचे वृक्ष पडले होते !!!!  इतके वर्ष सोबत असलेली कूणी व्यक्ती  अचानक आपल्याला सोडून जाते ही ते ही परत कधी न दिसण्यासाठी  ही कल्पनाच असह्य आहे. पण हेच सत्य आहे.

 आजीना आता काही वेळात घरून नेणार होते, अंगणात त्यांच्या मृत शरिराभोवाती सगळे jamale होते, प्रत्येकाचे रड़ने चालूच  hote, त्या मृत शरीराला कुणी आई म्हणून हाक मारत होते तर कुणी आजी , कुणी सासूबaई, तर कुणी माई !!! रडण्याचा आवाज  आसमंतात  पसरला होता !!!! 
हे सगळे पाहत असताना माझे लक्ष्य प्रेताच्या बाजूला उभे असलेल्या आजोबांकडे गेले....
पांढरा सदर, पांढरे धोतर ,दोन्ही हात काठीवर पुढे आलेले,चेहऱ्यावर  स्तब्ध   भाव , डोळ्यांच्या किनारी हलक्या ओल्या , नजारा फक्त त्या मृत शरीराच्या डोळ्यांकडे,   ........
 या सगल्या गर्दी मधे सगळ्यात दुखी असलेला चेहरा  मी पाहत होतो..... रडण्याच्या, आक्रोशाच्या आवजान्पेक्षा आजोबांचे स्तब्ध भाव लक्ष्य वेधून घेत hote, त्यांचे दुख आज आभाळ झाले होते !!!!  आयुष्यभर साथ देणारा सोबती आज हा प्रवास सोडून चालला होता!!!!! आजोबांचा कंठ दाटून आला होता .......
त्या सहप्रवाश्या वार फुले सोडताना त्यानी शेवटी तिला नोरोप दिला तो ही ह्या शब्दात -----------' तू मला फसवलेस !!!!!!!!!! तू मला फसवलेस !!!!!!'
हे शब्द कादाचीत सहज नसावे .... कारण त्याच्या मागच्या भावना प्रेमाच्या होत्या,जाणीवेच्या होत्या, गेले ७० वर्ष  सोबत असलेल्या प्रीयसीसाठी  होत्या..................... इतरांसाठी जरी ते एक मृत  शरीर होते  पण आजोबांसाठी ते अजूनही त्यांची नव विवाहित पत्नी होते, त्यांचे म्हातारपण इतरांसाठी होते  पण आजीसाठी ते अजूनही तरुण होते ...... त्या दोघांमध्ये चाललेला संवाद नक्कीच कुणी एकला नसेल पण शेवट हाच होता ...............................तू मला फसवलेस !!!!!!!!!!!!!!!!!!

कदाचीत आजी हे तर म्हणत  नसतील ............................

देशील का रे मित्र माझी साथ ?
म्हणशील का रे की तू एकटी नाहीस?
कधी मारशील कारे पाठीवर एक निस्वार्थी थाप?
कधी धरशील का रे विश्वासार्थी माझा हात ?
राहूदे रे. नको घेउस  तू अपेक्षांचा ओझं
तू नेहमीच नसणारेस हे मला कळतंय
पण तुझ्याआधी मीच निघणार असं वाटतंय...
मला आज फारच सुनं सुनं वाटतंय
मला आज फारच सुनं सुनं वाटतंय

(ही कविता माझी नाही ..........)
सुमीत !!!

Saturday, November 20, 2010

पावसाळ्यात पुण्यात !!!!!!

तसे पुण्यात येऊन बरीच वर्षे झालीत पण माझ्य्सारख्या काम नाशीबी माणसाला हे दृश्य यंदाच दिसले.....दरवर्षी हे होतच असेल हा माझा समज  झाला आहे !!!!!
किस्सा तसा छोटासा आहे पण म्हटल share करावा  तुमच्याशी !!!
 पाउस तसा भारतात सर्वत्रच .... पण पुण्यातला पाउस जरा स्पेशल !!!कारण इथले लोकच स्पेशल हो!!!!
पाउस आला की पौसाली कपडे, रेनकोट हे आलेच .... ह्या गोष्टी साधारण कूठल्याही दूकानात अगदी सहज मील्तील  अश्या आहेत. पण मी सांगतोय ते पुनायाबद्दल !!!
इथे लोकाना काही सवयी आहेत जश्या.....
एखादी गोष्ट ह्याना आवडली की त्याच्यासाठी ती ह्यांच्या आयूष्याचा अविभाज्य भाग बनते,
उदा. चीतले बंधू मिठाईवाले,जोशी वादेवाले .....
पुनेकरांच्या  जेवणात चीत्लेंचा कमीत कामी एक तरी पदार्थ हवा ... नाहीतर जेवणाची पौश्तीकता  कमी होते अस इथे समज आहे.
हा परत इथे दुकानामधे रंगा लावान्याचा ही प्रकार नेहमी पाहायला मिलतो....
आगदी रेनकोट च्याही ..... 
रमेश डाईंग हे पुनेकरंचे आगदी आवडीचे दूकान... तेव्हा पुनेकरंचे प्रेम इथे पावसाल्यात ऊतू जाते !!!!
लोकाना रांगेत उभे राहून, पाउस आला तरी पौसात भिजून,कीतीही गर्दी असली तरी ....एक तरी रेनकोट मिल्वायाचा आसतो!!!! त्यातच त्यांची धन्यता असते....समाधान असते !!!!

दोन तीन वर्षानी पानीपूरी वाल्याच्या गाडीवर कींवा दाभेली वाल्याच्या गाडीवर पुनेकरानी रांगा लावल्या तर त्यात काही ही आछार्य वाटणार नाही....!!!!





सुमीत !!!!!!

Thursday, November 18, 2010

अशक्य असे काहीच नाही !!!!!

अशक्य असे काहीच नाही !!!!!

आत्ता कुठे २०१० सुरु झाले होते, मी नुकतीच नवीन कंपनी जॉईन केली होती , सगळे जग नवीन होते ... नवीन जागा नवीन माणसे. सगळा काही नवीन होते. तसे मला नवीन लोकांमध्ये रुळायला जास्त वेळ लागत नाही.आणि झालेही तसेच.... माझ्या टीम मधल्या सगळ्यानशी बाराय्पैकी ओळख झाली. सोबतच अजून इतरही टीम होत्या ज्या आमचाच मनेजर च्या अंडर होत्या. त्यांच्यासोबत देखील ओळख वाढत होती. गप्पा, चहा,लंच सगळे एकत्र. फुल मज्जा.!!!!!! नेहमी प्रमाणे रुटीन चालू होते, गप्पा करता करता कुणी तरी बोलले की दुसर्या एका टीमचे दोन मेम्बर अमेरीकेला गेले आहेत म्ह्नणून ... माजे कान उगाच वर झाले.. .. मी पण जरा चौकशी करून घ्यावी असे ठरवले.... कारण सोपेच होते ..मला पण तिथे जायचे होते तेव्हा नव्या कंपनीत काही जमतंय का बघूया म्हंटल...!!!!! माजे प्रश्न चालू झाले .... खूप फंडू आहेत का रे ते..? खूप सिनिअर आहेत कारे ते? असे बरेच काही...... (या प्रश्नाची उत्तर ऐकणे म्हणजे मी स्वताहा अमेरीकेला जाण्या योग्य आहे की नाही हे मनातल्या मनात ठरवणे होते !!!!) बोलता बोलता बरेच डीटेल्स कळाले. दोघांपैकी एक मुलगा आणि एक मुलगी होती. दोघांचेही लग्न झालेले होते. त्याचे नाव होते योगेश आणि तिचे नाव होते अर्चना.

काही दिवसात ते परत येणार आहे असे कळले... माजी उत्सुकता वाढत होती कारण तुम्हला माहित आहेच. मी मनातल्या मनात दोघांचेही वर्णनं केले होते की हे दोघेही कसे असतील. पण जेव्हा त्यांना प्रत्यक्ष पहिले तेव्हा कळले की मी एक चांगला चित्रकार का नाही होऊ शकलो ते.!!!
अमेरिकेतून आल्यवर माणसांमध्ये एक विशिष्ट प्रकारचे बदल पाहायला मिळतात तसले काहीच बदल ह्या दोघांमध्ये नव्हते.बोलताना "whats up !!" नव्हते , खाताना only burger and Coke नव्हते.

अमेरीकॅतून परत आल्यवर कमीत कमी तिथले choclate तरी आणावेत ह ही आमच्या IT क्षेत्रातील पद्धत आहे. (कारण विचारू नका...!) अर्चनाने सर्वाना  मेसेज  टाकला (Please have chocolates on my desk - )

हे अगदी ठरलेले शब्द आहेत रोज कुणी न कुणी तरी हे जरूर लिहिणार कारण काही असू द्या मग. कुणाला मग पुत्र रत्न असो , कुणाचे लग्न असो , कुणाचा वाढदिवस असो, किवा कुणाच्या पुतणी ला ८० टक्के गुण मिळाले .... सर्व कारणांसाठी the only one message.
असे अनेक trends आहेत आमच्या IT industry मध्ये, कधीतरी नंतर गप्पा करूया त्याच्यावर. इथे मला जरा काही वेगळं share करायचा आहे तुमच्यशी.

तर मी बोलत होतो ते अर्चना आणी योगेश बद्दल . तसे दोघेही मराठी घराचे .. ह्याचा आवडीचा तांबडा रस्सा आणी पांढरा रस्सा तर तिला आवडती होती तर्री वाली वांग्याची भाजी ....... हा नाद खुल्या कोल्हापूरचा तर ती खानदेशी जळगावची!!!!

तसे दोघेही बसायला आमच्या शेजारच्याच cubical मध्ये होते. त्यांचा team मध्ये इतरही लोक होते. आम्ही सगळे चहाला , जेवणाला एकत्रच असायचो. सगळ्यांचे स्वभाव, आवड नावड, थोडा फार त्यांच्या घराविषयी सगळे हळू हळू समजायला लागले. सगळे एकत्र जमले की हसण्याचा कल्लोळ उठायचा!!!!  कधी फिल्मी गप्पा तर कधी financial planning चे धडे, कधी भूतकाळाच्या तर कधी भविष्याच्या गहन गप्पा, कधी शेअर मार्केट च्या गप्पा तर कधी सोन्याच्या भावावर गप्पा!!!!!!!!! (हे सगळे काम सांभाळून बर का !!!! )

अर्चान तशी गप्पा करायला नेहमीच पुढे असायची.... ती जेव्हा तिच्या गावाकडच्या गप्पा सांगायची तेव्हा तर हास्न्याची परवानी असायची. गावाला इतर स्त्रीयांकदून मीलणारी वागणूक,  कारण ही शहरामधे नोकरी  करणारी, अमेरिकेत जाउन आलेली, परत हीचा पगार तर एकुणच त्याना गर्गरी यायची.   घराचे आँगन कधी   ओलांडून न गेलेल्या बाeयाकान्साठी ही नाक्कीच चर्चेचा विषय असायlची.कुनाकडून खूप तिरस्कार तर कुनाकडून खूप प्रेम. असे अaनेक आम्बट गोड अनुभव अगदी दिलखुलास तिने आम्हाला सांगीतले.

एकदा सहज बोलता बोलता तीने एक किस्सा संगीताला, झाले  असे होते की हीच्या घरी कुणीतरी पाहूणे येणार होते (माला नक्की आठवत नाही ) की हीच कुठेतरी बाहेर गेली होती. रिक्शा मधून घरी परतताना बैग रिख्सा मधेच राहिली. हे तिच्या लक्षात आल्यवर ती लगेच त्या  रिक्शा stand वर गेली , तीथे उभे असलेल्या सर्व रिक्षवाल्याना हीने त्या रिक्षावाल्याचे वर्णन करून करून त्याचा पत्ता विचारला, पत्ता मिलला खरा पण तो ही जरा तोडका मोडका. तरी देखील ही त्या area मधे गेली तिथेही बरयाच घरामधे चौकशी केल्या नंतर शेवटी कुठे तो रिक्शावाला सापडला . Full filmi style हीने त्याचा पात्ता शोधून काढला.Rocking Archana!!!!
या rocking Archanachya  मागे कुठेतरी एक स्त्रीचे मन होते हे ही तेवढेच खरे. माझ्या माहितीप्रमाने अर्चना घरात सर्वात मोठी होती तिला अजून एक धाकटी बहिन आणी भाऊ होता.त्यामुले अजुनही महेरी तिची मदत होत होतीच.
पुढे काही दिवस अर्चना office ला आलीच  नाही , कुणीतरी सांगितले की तिच्या वडीलाना  hospital मधे admit  केले आहे म्हणून.कारण कलले नाही पण काही तरी serious होते हे नक्की. दोन दिवसानी अर्चना परत आल्यावर , तिचा तो गंभीर चेहरा, पनावालेले डोळे, झूक्लेले खांदे सगळे काही सांगत होते. या दोन दिवासमधे तीने जो काही त्रास सहन केला तो फ़क्त एक मुलगी आपल्या वादिलान्साठीच  करू शकते.त्यांना admit करण्यापासून ते रात्री त्यांच्या जवळ बसून अखी  रात्र  जागवान्या  पर्यंत हिने सरे  कही केले.
ऑफिस ला येउन सुधा हिचे मन मात्र हॉस्पिटल मधेच होते  ऑफिस ला आल्यावर कुणीतरी चौकशी केली की "आता काशी आहे गा तब्येत तुझ्या बाबांची ?" वेदनाना परत यायला फ़क्त शब्दही पुरेसे असतात!!!  या सहज प्रश्नाने देखील हेच केले .... तिच्या डोळ्यांच्या किनारी ओल्या केल्या !!! तरीही स्वतहाला सवारत, चेहर्यावर खोटे का होइना पण स्तब्ध भाव आणून उत्तर दिले "ठीक आहे आता .... होइल सुधार हलू  हलू  !!!!!!!!"  या स्तब्ध भावान्मधे जे काही दुख होते ते नक्कीच लपलेले नव्हते.
जमेल तेव्हा ऑफिस चे काम करने,hospiTalalaa जाणे बस हेच तीचे routine होते.

काल कुणासाठी थांबत नसतो !!!  आणी व्हायचे तेच झाले ..... मृत्यूशी लढता लढता अर्चानाच्या बाबानी प्राण सोडला!!!!!!
एका  क्षणात स्वताहाचे बालपण,तारुण्य, लग्न ... सार काही आठवल असेल त्या पोरीने आणी जमीनीवर कोसलली असेल ती!!!!!!
आयुष्यभर प्रकाश देणारी ज्योत आज मावालली होती, ज्योतीचा अंश असलेल्या अर्चानाला आज स्वतः ज्योत व्हायचे होते ......

काळ हे प्रत्येक दुखाचे औषध असते .... जसे जसे दिवस जात होते अर्चना स्थीर स्थावर होत होती, वडिलांच्या आठवणी हलू हलू धूसर होत होत्या, ती हलू हलू कामात रुलायला लागली होती. हेच आयुष्य आहे, हे असेच जगायचे असते !!!!

आजही कधी विषय निघालाच तर ती गर्वाने  सांगते की तीच्या वाडीलाना कीती अभीमान होता तीचा. तसा प्रत्येक बापाला आपल्या पोरांचा असतोच म्हणा!!!! पण इथे बापाची पोरगी अर्चना होती!!!! तेव्हा अभीमानास्पद काहीतरी वेगालेच होते .....
 
ही दहावीला असताना ह्यांची परीस्थीती अगदी बेताची होती, चालीत एक खोलीच्या घरात संसार होता ..... वादीलांच्या जेम तेम पगारावर घर चालले होते ......      बरेचदा खोलीत लाइट पण नसायचे तेव्हा ही  कधी कधी स्ट्रीट लाइट वर जाउन अभ्यास करायची, नाहीच झाले  कधी तर रोकेल तेलाच्या ल्यंप ने सुद्धा हीने अभ्यास केला...  (एकताना कान अगदी सुन्न झाले होते !!!! माला माझे दहावीचे दिवस आठवले ..... आईने जवळ आणून दिलेला गरम ढूधाचा ग्लास आठवला ...... भीजून दिलेल्या बादाम बिया आठवाल्या , बाबानी अनुन दिलेली शंख्पूश्पी ची बोटल आठवली .... आणी विचार आला की आपण जर अर्चानाच्च्या जागी असलो असतो तर आजही दहावी पास झालो नसतो !!!!!!)

वर्ष कसे निघून गेले ते  कलले सुद्धा नाही , दहावीच्या परीक्षा सुरू झाल्या हीचा अभ्यास तसा पूर्ण होता.... त्यामागे तीची मेहनत होती. नेहमीप्रमाणे ही रात्री अभ्यास करत होती, दुसरया दिवशी science चा पेपर होता ,  नेहमीप्रमाणे आजही लाइट नव्हती, हीचा रोकेल तेलाच्या ल्यंपवार अभ्यास चालू होता , बरीच रात्र झाली होती , वाचता वाचता हीला झोप  लागली, हातातली वाही कधी दिव्याला लागली ते कलले नाही .. वहीने पेट घेतला ..... हीला जाग येई पर्यंत अर्धी वही जलाली होती !!!!! जाग आल्यवर हीला अश्रू थाम्ब्वेना , आईने तीला संभालले......
 
काही महीन्यानी निकाल लागला ,,,, अर्चना ८५% घेऊन शालेत सर्वप्रथम आली होती !!!!!! तिच्या आणी वादीलांच्या आनंदाला गगन सीमा पण कमी पडत होत्या ..... चलीताल्या चोंकामधे "अर्चना" च्या नावाचे मोठे baner लागले होते.....  गर्वाने तीचे बाबा ते सगाल्य्ना दाखवत होते  ... अगदी बापने छाती ठोकून सांगावे असेच हीचे कर्तुत्व  होते!!!! 

आज अर्चना infosys नावाच्या एक मोठ्या IT कंपनीत कामाला आहे , तीच्याकडे बघीतल्यावर नक्कीच वाटत की अशक्य असे काहीच नाही !!!!!



सुमित !!!!!!

Sunday, July 11, 2010

पावसाळ्यात पुण्यात !!!!!!

तसे पुण्यात येऊन बरीच वर्षे झालीत पण माझ्य्सारख्या काम नाशीबी माणसाला हे दृश्य यंदाच दिसले.....दरवर्षी हे होतच असेल हा माझा समाज झाला आहे !!!!!
किस्सा तसा छोटासा आहे पण म्ह्नाटला

Saturday, February 13, 2010

Gabricha Paus !!!!!!!!!!!!!

It was the regular Saturday ... and we were more lazy as compared to the the other days in the week. I was just looking for something that I can make time pass with for 2-3 hours . News paper was over ..Idiot box was not showing some thing spectacular...bla bla....

Few days back we heard the news for one movie called as "Gabricha Paus" with the following data (collected from others sites)

* Best Marathi Film - Pune International Film Festival, India (2009)

* Special Jury Award - Maharashtra State Film Awards, India (2009)

* Best Editing Award - Ahmadabad International Film Festival, India (2009)

* Awarded - Hubert Bals Fund for Distribution

* Official Selection - Festival International du film de Rotterdam, Netherlands

* Official Selection - Transylvania International Film Festival, Romania

* Official Selection - Durban International Film festival, South Africa

* Official Selection - Indian Film Festival of Los Angeles (IFFLA), LA

* Official Selection - Vancouver International film festival, Canada

* Official Selection - Warsaw International film festival, Poland

* Official Selection - Bollywood and Beyond, Stuttgart, Germany

* Official Selection - Habitat Film Festival, New Delhi, India

* Official Selection - Goa Marathi Film festival, India

* Official Selection - Kolhapur International Film Festival, India

* First Prize - BMM Convetion Film Festival, Philadelphia, USA
Plot Outline:

For Movie info please refer to:
http://wogma.com/article/gabhricha-paus-tragedy-of-a-farmer-through-humour/

I had this movie in our collection because of above reasons but till date before writing this blog I had not seen it.So today was the day ... to feel the dark side of life.


I was astonished to see the simplicity of the presentation of the movie.
If from the above link you had an idea about the script of the movie then I wont tell you that again.

Point indeed to mention here being a realistic movie based on the everyday suicide in the Vidarbha region of the Maharashtra state must be watched by every politician who are supposed to help those people.

When we say ourselves as the developing country we are one step back if we can not tackle the situations pictured in the movie.


I would like to make a humble request to every capable Indian and government indeed to help those families who are really suffering and suffering to such extend to think of the death as the solution to live happily.......!